Siddhayog
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
शिवसामरस्य्

Shree Dattatreyaअध्यात्मविद्येचेज्ञान हे भारताचे वैशिष्ट्य असून आपल्या सांस्कृतिक वारशातिल ती एक वैभवशाली गोष्ट आहे. यामुळे या शास्त्राच्या अर्थाचा, सर्व संतांच्या व पंथांच्या तसेच धर्मांच्या सारस्वतांच्या प्रांगणात शिरून विचार केला पाहिजे. मनोजय आणि प्राणजयासाठी श्रीसद्गुरूकृपाप्राप्त साधन प्रणालीने आत्मसत्तारूपी कुंडलिनी महाशक्तिचा सुप्त उन्मेष जागृत होऊन अकथनिय व अनिर्वचनिय आनंदाची प्राप्ती होऊन जीवनमुक्तिरूपी मोक्षसुख अवश्य प्राप्त होते.

उपरोक्त बाब अनादि काळापासून असंख्य ग्रंथरूपाने विविध भाषांमध्ये,विविध धर्मपंथांच्याव्दारा साकार झालॆली आहे, परंतु या ग्रंथातील रहस्य आपल्या संप्रदायाबाहेर इतरांना कळू नये याकरिता गूढ व सांकेतिक परिभाषेत सूत्रात्मक रीतीने लिखाण करण्याचा प्रघात आहे. त्याचा नेमका अर्थ संप्रदायातील आचार्यांकडून जर समजला नाही तर त्याचा विपरित अर्थ होणे स्वाभाविकआहे. पारिभाषिक संज्ञांच्या नेमक्या अर्थांचे ज्ञान नसल्यामुळे किंवा शब्दांच्या परार्थापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिचा किंवा पात्रतेचा अभाव असल्यामुळे शक्तिपातयोग अर्थात् सिध्दमहायोगशास्त्रातील अगणित महत्त्वपूर्ण सिद्धांन्त किंवा तत्त्वे अनेक ग्रंथ व इतरही वाङ्मय प्रकारांतून गुढतेच्या अवगुंठनात पडून आहेत. त्याचे यथार्थ ज्ञान जिज्ञासू, अभ्यासक व सिध्दयोगसाधकभक्तयोगी शिष्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

या पार्श्र्वभूमिवर शक्तिपातयोगशास्त्राचे अर्थात सिध्दमहायोगशास्त्राचे निखळ शास्त्रीय स्वरूप व त्यातील पैलू सिध्दयोग-साधकभक्तयोगिशिष्य,अभ्यासक आणि जिज्ञासुंना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने अध्यात्मविद्येची चर्चा करणारे विविध भाषांतील वाड्.मय, त्यावरील परार्थात्मक टीकांसह उपलब्ध करणे,आध्यात्मिक उन्नत्तीच्या व कल्याणाच्या हेतुने अलौकिक सत्पुरूषांची श्रेष्ठ दिव्य जीवनचरित्रे आणि अमोलिक अशा वाड्.मयातील परार्थक व प्रत्ययात्मक अनुभूतींचा व प्रणालींचा आशय स्पष्ट करण्यासाठी संशोधन करणे इत्यादि महत्त्वपूर्ण कार्ये करण्याच्या उद्देशाने  "श्री संत गुळवणी महाराज सिद्धयोग संशोधन प्रतिष्ठान,पुणे." या न्यासाची स्थापना करण्यात आलेली आहे.